शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले साडे सोळा महिन्यांनी शरण

By विजय.सैतवाल | Updated: January 15, 2024 21:50 IST

गुन्हा दाखल झाल्यापासून होते पसार, दोन दिवसांची पोलीस कोठडी.

जळगाव: मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले गुन्हा दाखल झाल्यानंतर साडे सोळा महिन्यांनी सोमवार, १५ जानेवारी रोजी पोलिसांना शरण आले. त्यांना अटक करून दुपारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, बकाले यांना अटक करण्यात आल्याचे व त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे समजताच मराठा समाज बांधव तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी न्यायालय परिसरात जमा झाले होते. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्तदेखल तैनात करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेत निरीक्षक पदावर असताना बकाले यांनी त्यांच्याच कार्यालयातील सहायक फौजदाराशी मोबाईलवर बोलताना मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याची ऑडीओ क्लीप समाजमाध्यमात व्हायरल झाल्यानंतर मोठा रोष व्यक्त करण्यात आला. यात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात मोठे आंदोलनदेखील झाले.  गुन्हा दाखल झाल्यापासून ते पसार होते. अखेर बकाले सोमवार, १५ जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता तपास अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्याकडे हजर झाले. त्यांना ११ वाजता अटक करण्यात आले. त्यानंतर पोलिस कोठडीच्या मागणीसाठी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्या. केळकर यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील प्रिया मेढे यांनी तर बकालेतफे ॲड. सूरज जहांगिर यांनी काम पाहिले. तर हरकतदारांतर्फे ॲड. गोपाळ जळमकर यांनी युक्तीवाद केला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalgaonजळगावPoliceपोलिस