जळगावातून सात दुचाकी चोरणारा संशयित अटकेत
By Admin | Updated: April 30, 2017 18:32 IST2017-04-30T18:32:31+5:302017-04-30T18:32:31+5:30
न्यायालयाने सुनावली दोन दिवसाची कोठडी. शहर पोलिसांनी लावला छडा

जळगावातून सात दुचाकी चोरणारा संशयित अटकेत
जळगाव,दि.30- दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अट्टल असलेल्या मोहमद आरिफखान हाफिजखान (वय 23 रा. गोघर,जि. रिवा ह.मु.सुप्रीम कॉलनी, जळगाव) याला शहर पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेतले. त्याच्याकडून 1 लाख 88 हजार रुपये किमतीच्या चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. दरम्यान, त्याला अटक करुन रविवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
शिवाजी नगरातील रेल्वे स्टेशनजवळील रिक्षा थांब्यावरुन 15 एप्रिल रोजी अनिल भगवानराव झंवर (वय 54 रा.प्रेम नगर, जळगाव) यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.19 ए.एफ.7668) चोरी झाली होती. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दुचाकी सुप्रीम कॉलनीत राहणा:या मोहमद आरिफ खान याने चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.