आई-वडिलांचा कोरोनाने तर मुलीचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:15 IST2021-07-25T04:15:38+5:302021-07-25T04:15:38+5:30

जळगाव : दोन महिन्याआधी कोरोनामुळे आधी वडील...नंतर आई आणि आता अचानक कन्येचाही मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी ...

Suspected death of parents by Corona and daughter | आई-वडिलांचा कोरोनाने तर मुलीचा संशयास्पद मृत्यू

आई-वडिलांचा कोरोनाने तर मुलीचा संशयास्पद मृत्यू

जळगाव : दोन महिन्याआधी कोरोनामुळे आधी वडील...नंतर आई आणि आता अचानक कन्येचाही मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजता जळगाव शहरात घडली. आरती साहेबराव बाविस्कर (३३, रा़ खोटेनगर, जळगाव) असे मयत तरूणीचे नाव आहे.

आरती ही सकाळी ९ वाजता घरातील स्वच्छतागृहात गेली होती. मात्र, बराच वेळा झाल्यानंतरही ती स्वच्छतागृहातून बाहेर आली नाही. त्यामुळे तिच्या भावाने दार ठोठावले. आतून प्रतिसाद न मिळाल्याने भावाने दरवाजा तोडला. त्यावेळी आरती बेशुध्द अवस्थेत आढळून आली. त्यांनी तत्काळ खाजगी रूग्णालयात तिला उपचारार्थ दाखल केले. मात्र, दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास आरती यांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच मृत्यूचे कारण अद्याप समजून आलेले नाही.

Web Title: Suspected death of parents by Corona and daughter