भुसावळच्या बेपत्ता तरुणाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 21:56 IST2020-03-01T21:56:10+5:302020-03-01T21:56:16+5:30
तापीत आढळले प्रेत

भुसावळच्या बेपत्ता तरुणाचा संशयास्पद मृत्यू
भुसावळ/ यावल : भुसावळ शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी रवी प्रकाशलाल मूलचंदानी (३०) या शनिवारपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा रविवारी दुपारी यावल हद्दीतील तापी नदीपात्रात मृतदेह आढळला. यामुळे खळबळ उडाली आहे. या तरुणाने आत्महत्या केली की ? अन्य कारणाने त्याचा मृत्यू झाला? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे.
या घटनेबाबत यावल पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. मयत रवी मूलचंदानी याचे शहरात मोबाईल दुकान आहे. तो नेहमीप्रमाणे शनिवारी दुकानावर जाण्यासाठी निघाला मात्र त्यानंतर घरी न परतल्याने त्यांचा सर्वत्र शोध सुरू करण्यात आला होता. दरम्यान रविवारी दुपारी यावल पोलिस ठाणे हद्दीतील अंजाळेनजीक या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळावर तरुणाची दुचाकीदेखील आढळली आहे. मृत तरुणाच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी असा परीवार आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
याबबात अकस्मात मृत्युची नोंद यावल येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या माार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नेताजी वंजारी व सहकारी हे करीत आहे.