भुसावळ येथील सराईत फरार गुन्हेगारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 13:20 IST2019-07-17T13:19:42+5:302019-07-17T13:20:06+5:30

आरोपी विरुद्धचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार

Suspected absconding gangster arrested in Bhusawal | भुसावळ येथील सराईत फरार गुन्हेगारास अटक

भुसावळ येथील सराईत फरार गुन्हेगारास अटक

भुसावळ, जि. जळगाव : येथील खडका रोड वरील रजा चौकामध्ये लाल बिल्डिंग पुढे विद्यार्थ्यावर चाकू हल्ला करून त्याच्या जवळील प्रवेश शुल्काचे पैसे हिसकावून घेणारा संशयित आरोपी असिफ ऊर्फ बाबा काल्या अस्लम बेग यास पोलिसांनी १६ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अटक केली आहे. ही घटना ५ जुलै रोजी दुपारी एक वाजून वीस मिनिटांच्या सुमारास घडली होती. घटना घडल्यापासून आरोपी फरार होता. दरम्यान, आरोपी विरुद्ध विविध प्रकारचे सहा गुन्हे दाखल आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आह, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
शहरात रजा चौक भागात लाल बिल्डिंगच्या पुढे फिर्यादी अरबाज शकील आझाद ( वय - २२ ) रा.खडका रोड हे महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जात होते त्यावेळी आरोपी आसिफ बेग याने फिर्यादी अरबाज शकील आजाद यांना अडवून जबरीने त्यांच्या खिशातून ६ हजार २०० रुपये हिसकवले. यावेळी फिर्यादीने प्रतीकार केला असता आरोपी ने त्यास चाकू मारुन दुखापत केली होती.

Web Title: Suspected absconding gangster arrested in Bhusawal

टॅग्स :Jalgaonजळगाव