खडसेंचा प्रवेश झाला तरी सुरेशदादा जैन हेच जिल्ह्यात शिवसेनेचे नंबर एकचे नेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:20 PM2019-12-16T12:20:48+5:302019-12-16T12:22:31+5:30

संजय सावंत : जिल्हा बॅँक व दुध फेडरेशनच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच लढणार

Sureshdada Jain is the number one leader of the Shiv Sena in the district, even though Khadse has entered. | खडसेंचा प्रवेश झाला तरी सुरेशदादा जैन हेच जिल्ह्यात शिवसेनेचे नंबर एकचे नेते

खडसेंचा प्रवेश झाला तरी सुरेशदादा जैन हेच जिल्ह्यात शिवसेनेचे नंबर एकचे नेते

googlenewsNext

जळगाव : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे पक्ष सोडतील का नाही? हा निर्णय त्यांनाच करायचा आहे. खडसेंना शिवसेनाच एक चांगला पर्याय असून त्यांच्यामुळे शिवसेनेला बळकटी मिळेल, यात शंका नाही. याबाबतचा निर्णय सेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याशी चर्चा करूनच होणार आहे. तसेच खडसेंचा सेनेत प्रवेश झाला तरी सुरेशदादा जैन हेच जिल्ह्यात सेनेचे नंबर एकचे नेते राहतील, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी ‘लोकमत’ला दिली.
संजय सावंत यांनी रविवारी ‘लोकमत’ शहर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर विष्णू भंगाळे, नगरसेवक अमर जैन, शिवसेनेचे शहर संघटक दिनेश जगताप आदी उपस्थित होते. माजी मंत्री एकनाथराव खडसे हे मोठे नेते आहेत. तसेच त्यांचा निर्णय घेण्यास ते सक्षम असून, शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला तर जिल्ह्यात व राज्यात शिवसेनेला नक्कीच बळकटी मिळेल. तसेच त्यांच्या प्रवेशाबाबत सुरेशदादा जैन यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले. सुरेशदादा जैन यांच्या दुरदृष्टीमुळे जळगाव शहराचा जो विकास झाला आहे, तो आजही दिसून येतो. १९९५मध्ये युती सरकारच्या काळात सुरेशदादा जैन यांनी जळगाव शहरात राबविलेल्या गृहनिर्माण योजनांचे काम पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरेशदादांना गृहनिर्माण मंत्रीपद दिल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

महाविकास आघाडीचा प्रयोग जिल्हास्तरावर राबवणार
राज्यात शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस व कॉँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली आहे. तोच प्रयोग आता जिल्हास्तरावर राबविण्यात येणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली. याची सुरुवात जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या जिल्हा बॅँक, दुध फेडरेशन व बाजार समित्यांचा निवडणुकांपासून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासह जिल्हा परिषद, महानगरपालिका किंवा नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये हा प्रयोग केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना संपविण्यासाठी भाजपाने प्रयत्न केले
लोकसभा निवडणुकीत युती म्हणून प्रत्येक शिवसैनिकाने खासदार उन्मेष पाटील व रक्षा खडसे यांच्यासाठी काम केले. पाचोºयातील शिवसैनिकांवर भाजपा नेतृत्वाने केलेला अन्याय विसरून आमदार किशोर पाटील यांच्यासह सेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी भाजपा उमेदवारांसाठी काम केले. मात्र, विधानसभा निवडणुकीत युती असतानाही भाजपाने बंडखोरांना मदत केली. माझ्या कारकिर्दीत पहिल्यांदाच कोणत्या बंडखोरांने १६ कोटी रुपये खर्च केल्याचे दिसून आले. भाजपाने जिल्ह्यातील शिवसेना संपविण्यासाठी नको ते प्रयत्न केले. मात्र, शिवसेनेने या निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली असल्याचे सांगितले.

Web Title: Sureshdada Jain is the number one leader of the Shiv Sena in the district, even though Khadse has entered.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.