जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपातर्फे आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नीला संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 17:07 IST2018-09-15T17:07:23+5:302018-09-15T17:07:39+5:30
१८ सप्टेंबर रोजी विशेष सभा

जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपातर्फे आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नीला संधी
जळगाव : जळगावच्यामहापौरपदासाठी भाजपाचे आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांनी शनिवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याचा शनिवार, १५ रोजी शेवटचा दिवस होता. १८ सप्टेंबर रोजी आता विशेष सभा होणार असून त्यात निवड होईल.
भाजपातर्फे महापौरपदासाठी सीमा भोळे यांनी तर शिवसेनेतर्फे जयश्री महाजन यांनी आणि उपमहापौरपदासाठी भाजपातर्फे डॉ.अश्विन सोनवणे तर शिवसेनेतर्फे प्रशांत नाईक यांनी अर्ज दाखल केला.
भाजपातर्फे महापौरपदासाठी अनेक उमेदवार इच्छूक होते. अखेर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आमदार भोळे यांच्या पत्नीला संधी दिली. भाजपाने सत्ता मिळविल्यापासून महापौरपदी कुणाला संधी मिळते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून होते.