शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

संडे स्पेशल मुलाखत_ भाजपकडून खच्चीकरणाचा अनुभव मी स्वत: घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 7:38 PM

आक्रमक आणि डोईजड होणारे नेतृत्व, कार्यकर्ते भाजपात चालत नाही.

ठळक मुद्देअ‍ॅड. ईश्वर जाधव यांनी व्यक्त केल्या भावनासंडे स्पेशल मुलाखतआक्रमक आणि डोईजड नेतृत्व भाजपात चालत नाही.

चाळीसगाव : आक्रमक आणि डोईजड होणारे नेतृत्व, कार्यकर्ते भाजपात चालत नाही. त्याचे पद्धतशीर खच्चीकरण केले जाते, याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे हे याच आक्रमकतेचे बळी ठरले आहे. तथापि त्यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने जिल्ह्यात भाजपला मोठा फटका बसणार हे निश्चित आहे. यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढेल. चाळीसगाव तालुक्याची राजकीय गणितेही बदलतील. राष्ट्रवादीसाठी खडसेंचे पक्षांतर बेरजेचे असेल. मी मात्र काँग्रेस पक्ष सोडणार नाही, असे मत माजी आमदार ॲड. ईश्वर जाधव यांनी व्यक्त केले. ह्यलोकमतह्णशी त्यांनी संवाद साधला. १९९०मध्ये एकनाथराव खडसे यांच्यासोबतच आमदार म्हणून निवडून आलेले ॲड. ईश्वर जाधप यांनी ह्यलोकमतह्णशी संवाद साधला.प्रश्न : एकनाथराव खडसे यांच्यावर भाजप सोडण्याची वेळ का आली?मुक्ताईनगरात स्वत: खडसे आणि चाळीसगाव तालुक्यात मी. आम्ही दोघांनी भाजपाचे निशाण रोवत परिसर पिंजून काढला. खूप आक्रमकता भाजपात चालत नाही. डोईजड होऊ पाहणाऱ्या नेतृत्वाला घेरले जाते. पक्षासाठी खूप काही करुनही एकनाथराव खडसे यांना आक्रमक कार्यपद्धतीमुळे भाजप सोडावा लागला. मी १९९० मध्ये भाजपतर्फे चाळीसगाव मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेलो. माझ्या रुपाने भाजपचे तालुक्यात खाते उघडले. माझीही आक्रमकता अडसर ठरली. मला पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केले गेले. माजी आमदार अरुण पाटील, डॉ. बी. एस. पाटील यांचीही कथा अशीच आहे. यात एकनाथराव खडसे हे अजून एक नाव वाढले आहे.प्रश्न : खडसे यांच्या पक्षांतराचा जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल?जाधव : खडसे यांच्यामुळे राष्ट्रवादीचे बळ वाढेल. याचा साहजिकच फटका भाजपला बसेल. खडसे आणि भाजपातील कलगीतुराही वाढलेला दिसून येईल. आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला धक्का देईल. ही राष्ट्रवादीसाठी बेरीज तर भाजपासाठी वजाबाकी असेल. काँग्रेस आणि शिवसेनेलाही संधी मिळेल. एकूणच महाविकास आघाडीला जिल्ह्यात ह्यअच्छे दिनह्णयेतील.प्रश्न : भाजपाने खडसेंबाबत चूक केली असे म्हणायचे का?जाधव : हो निश्चितच. पक्षासाठी अपार कष्ट करणा-या कार्यकर्त्याला, नेतृत्वाला नामोहरम करणे त्याच्यासाठी क्लेशदायीच असते. ते एकनाथराव खडसेंबाबत झाले.प्रश्न: चाळीसगावच्या राजकीय सारीपाटावर काय परिणाम होतील ?२००९ चा अपवाद वगळता प्रत्येक विधानसभेत भाजपने विजयी गुलाल उधळला. त्याचा पाया १९९० मध्ये माझ्या विजयाने रचला गेला. भाजपचा हा बालेकिल्ला एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने काहीसा ढासळेल.प्रश्न : तुम्हीही राष्ट्रवादीत जाणार का?अजिबात नाही. मी काँग्रेसचेच काम करणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत जाण्याचा प्रश्न नाही. आमची महाविकास आघाडी असल्याने काँग्रेसलाही फायदा होईल.

 

 

टॅग्स :interviewमुलाखतChalisgaonचाळीसगाव