सुजीत वाणी हा कंडारेचा खास माणूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:47 IST2021-01-08T04:47:42+5:302021-01-08T04:47:42+5:30
सुजीत वाणी याच्या जामीन अर्जावर सरकार पक्षाचे वकील प्रवीण चव्हाण यांनी युक्तीवाद करतांना, सुजीत वाणी हा कंडारेचा खास ...

सुजीत वाणी हा कंडारेचा खास माणूस
सुजीत वाणी याच्या जामीन अर्जावर सरकार पक्षाचे वकील प्रवीण चव्हाण यांनी युक्तीवाद करतांना, सुजीत वाणी हा कंडारेचा खास माणूस होता, तोच सर्व बीएचआरमध्ये झालेल्या व्यवहाराची इन्ट्री करत होता. कारवाईसाठी जेव्हा पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक आले. त्यावेळी वाणी हा त्याची कॅबिन बंद करुन पळून गेला होता. तसेच त्याने अधिकार्यांना बीएचआरचे रेकॉर्ड दिले नाही. त्याचा गुन्ह्यात महत्वाचा सहभाग असल्याबाबत पुरावेही अॅड. चव्हाण यांनी न्यायालयासमोर सादर केले. दोन्ही पक्षाने युक्तीवाद केला असून जामीनावरील निकालासाठी ११ जानेवारी ही तारीख दिली आहे.
इतर संशयित महावीर जैन, तसेच दलाल यांनीही जामीनासाठी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी विवेक ठाकरे याच्या अर्जावर ६ जानेवारी रोजी कामकाज आहे. तर इतरांच्या जामीन अर्जावर ११ , १२ तसेच १५ जानेवारी रोजी कामकाज होणार आहे.विवेक ठाकरे, महावीर जैन, धरम साखंला, सुजीत वाणी, यांच्यासह कंडारेचा चालक कमलाकर भिकाजी कोळी न्यायालयीन कोठडीत आहेत तर कंडारे व सुनील झंवर अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.