वाघोड येथे एकाची झेलम एक्स्प्रेसखाली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 16:38 IST2018-05-16T16:38:46+5:302018-05-16T16:38:46+5:30
रावेर तालुक्यातील वाघोड येथील माळू माधव निंभोरे (वय ४७) यांनी झेलम एक्स्प्रेससमोर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उभे राहून आत्महत्या केल्याची घटना घडली.

वाघोड येथे एकाची झेलम एक्स्प्रेसखाली आत्महत्या
आॅनलाईन लोकमत
रावेर, दि.१६ - तालुक्यातील वाघोड येथील माळू माधव निंभोरे (वय ४७) यांनी झेलम एक्स्प्रेससमोर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उभे राहून आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वाघोड येथील रहिवासी माळू माधव निंभोरे हे सकाळी बाहेर आले. त्यांनी अप ११०७८ झेलम एक्स्प्रेस समोर उभे राहून आत्महत्या केली. ही घटना अप रेल्वेमार्गावर खंबा क्रमांक ४८४ /११ जवळ सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. मानसिक नैराश्यातून ही आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक संतोष चौधरी पुढील तपास करीत आहेत.