पाथरी येथे तरुणाची नैराश्यातून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 18:15 IST2018-12-17T18:08:55+5:302018-12-17T18:15:05+5:30
पाथरी येथे नवल संतोष चौधरी (वय ३०) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजता घडली.

पाथरी येथे तरुणाची नैराश्यातून आत्महत्या
जळगाव : तालुक्यातील पाथरी येथे नवल संतोष चौधरी (वय ३०) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवल हा दहा दिवसापूर्वीच नाशिक येथे कामासाठी गेला होता. दोन दिवसापूर्वी तो घरी परत आला. शनिवारी रात्री घरात दोरीने गळफास लावून त्याने जीवन संपविले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस पाटील संजीव लंगरे व गावकऱ्यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
नवल हा विवाहित होता,परंतु लग्नानंतर काही दिवसातच पत्नी सोडून गेली. त्यामुळे तो नैराश्यात होता. वडील संतोष अंबु चौधरी यांचे निधन झाले आहे. त्यामुळे नवल हा एकटाच घरात कर्ता होता. लहान भाऊ अजय, आई लताबाई मिळेल ते काम करतात. बहिण माया विवाहित आहे. तपास भरत लिंगायत करीत आहेत.