समता नगरात तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:51+5:302021-07-02T04:12:51+5:30
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा परप्रांतीय असलेला राजेश आपल्या कुटुंबीयांसह समता नगरात अनेक वर्षांपासून वास्तव्याला होता. राजेश याचे ...

समता नगरात तरुणाची आत्महत्या
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा परप्रांतीय असलेला राजेश आपल्या कुटुंबीयांसह समता नगरात अनेक वर्षांपासून वास्तव्याला होता. राजेश याचे ऑटोनगरात डंपर बॉडी चेसेस रिपेअरिंगचे गॅरेज आहे. त्याने एका व्यक्तीजवळून एक ते दीड वर्षांपूर्वी डंपर विकत घेतले होते. या डंपरला दुरुस्तीसाठी राजेशने जवळपास ३ लाख रुपये खर्च केला होता. ज्या व्यक्तीकडून डंपर विकत घेतले होते. त्याला ५० हजार रुपये देण्याचे बाकी होते. पैसे बाकी असल्यामुळे समोरील व्यक्ती त्याला तगादा लावून धमक्या देत होती. दरम्यान, पैसे दिले नाहीत म्हणून हे डंपर संबंधित व्यक्ती बळजबरीने हिसकावून घेऊन गेली. या कारणामुळे तो तणावात होता. बुधवारी रात्री त्याने परिवारासह जेवण केले. घरात मागच्या खोलीत जाऊन झोपला. सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. दरम्यान, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे अनमोल पटेल यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. कर्जबाजारीपणा व डंपरचे कारण कुटुंबीयांकडून सांगितले जात आहे. असे असले तरी नेमके कारण काय आहे, हे तपासातच समोर येईल, असे अनमोल पटेल यांनी सांगितले. राजेशच्या पश्चात पत्नी, दोन मुली, पत्नी, आई, तीन बहिणी, मोठा भाऊ असा परिवार आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.