कानळदा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 13:38 IST2018-10-20T13:37:14+5:302018-10-20T13:38:20+5:30
दुपारी उघडीस आली घटना

कानळदा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव : तालुक्यातील कानळदा येथील रहिवासी गणेश भास्कर सपकाळे (३३) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडीस आली.
या बाबत जिल्हा रुग्णालयात नातेवाईक व गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व सेंटरींगचे काम करून उदरनिर्वाह करणारा गणेश सपकाळे हा शुक्रवारी दुपारी कामावरून लवकर घरी आला. त्याची पत्नी शेतात तर दोन्ही मुले शाळेत गेलेले होते आणि वयोवृद्ध वडील घराबाहेर झोपलेले होते. त्यावेळी घरात गणेश सपकाळे याने गळफास घेतला. इयत्ता चौथीत शिकणारा मुलगा घरी आला त्या वेळी त्याला हे दृष्य दिसले. आजूबाजूच्या रहिवाशांनी धाव घेतली व गणेशला जिल्हा रुग्णालयात हलविले. येथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.