फैजपुरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 18:50 IST2017-12-23T18:46:19+5:302017-12-23T18:50:58+5:30

फैजपुरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
आॅनलाईन लोकमत
फैजपूर,दि.२३ : शहरातील दक्षिण बाहेरपेठ भागातील ३५ वर्षीय विवाहित तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
मयत तरुणाचे नाव घनश्याम देवीदास नाथजोगी असे आहे. घनश्याम याने घराच्या वरच्या मजल्यावर रूमालाच्या साहाय्याने गळफास घेतला. बराच वेळ झाला तरी घनश्याम नाथजोगी हे खाली न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले. त्यावेळी आत्महत्या केल्याची बाब निदर्शनास आली. या घटनेनंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी पंचनामा केला. या प्रकरणी देवीदास नाथजोगी यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास फौजदार रामलाल साठे करीत आहेत.