जळगाव येथे टेन्ट हाऊस मालकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 13:08 IST2018-05-29T13:08:59+5:302018-05-29T13:08:59+5:30
नातेवाईकांची रूग्णालयात गर्दी

जळगाव येथे टेन्ट हाऊस मालकाची गळफास घेऊन आत्महत्या
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २९ - कुटुंबिय दुसऱ्या मजल्यावर झोपलेले असताना घराच्या खालच्या खोलीत गळफास घेऊन संजय अरूण पंगारे (वय-४४, रा़ गुजराज पेट्रोलपंप परिसर) यांनी जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी ४़३० वाजता घडली़ आत्महत्तेचे कारण मात्र समजून आलेले नाही़
संजय अरूण पंगारे हे पत्नी, मुलगा व दोन मुलींसह गुजराल पेट्रोल पंप परीसरात वास्तव्यास होते़ त्याचे याच परिसरात वैष्णवी टेन्ट हाऊसेचे दुकान आहे़
सोमवारी दुपारी घराच्या खालच्या खोलीत जास्तच उकाडा वाटत असल्यामुळे पत्नी, मुलगा व मुली हे वरच्या मजल्यावरील खोलीत झोपण्यासाठी गेले़
कुटुंबिय वरच्या खोलीत झोपलेले असल्याचे पाहून संजय यांनी खालच्या खोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला़ मुलगा सोनू खाली आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला़ त्याने आईला बोलविल्यानंतर संजय यांना रिक्षातून त्वरीत जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविले़ यावेळी डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
कुटुंबियांचा आक्रोश
संजय यांचा मृत्यू झाल्याचे कळताच पत्नी व मुलाने रूग्णालयात हंबरडा फोडत एकच आक्रोश केला़ यावेळी नातेवाईकांची गर्दी रूग्णालयात झाली होती़ दरम्यान, यापूर्वी देखील एकदा त्यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे काहीनी सांगितले़