पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर पतीचीही विष घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 06:57 IST2018-12-02T06:57:23+5:302018-12-02T06:57:25+5:30

पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर पतीनेही विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ रोजी दुपारी बारा वाजता चिंचखेडेसीम, ता.बोदवड येथे घडली.

Suicide by taking husband's poison after wife's suspicious death | पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर पतीचीही विष घेऊन आत्महत्या

पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर पतीचीही विष घेऊन आत्महत्या

जळगाव : पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर पतीनेही विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ रोजी दुपारी बारा वाजता चिंचखेडेसीम, ता.बोदवड येथे घडली. आत्माराम रामभाऊ पाटील (४३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
सुनीता आत्माराम पाटील यांचा एका शेतात संशयास्पद मृत्यू झाला होता. यानंतर पती आत्माराम पाटील याने गुरांच्या खळ्यात विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या केली. दोन दिवसात पती- पत्नीच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Suicide by taking husband's poison after wife's suspicious death