शिंदाड येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 22:39 IST2019-01-31T22:39:11+5:302019-01-31T22:39:29+5:30
पाचोरा : तालुक्यातील शिंदाड येथील शेतकरी व आरोग्य विभागात आरोग्यसेवक पदावर कार्यरत असलेले सुनील गिरधर पाटील (वय ४७) यांनी ...

शिंदाड येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
पाचोरा : तालुक्यातील शिंदाड येथील शेतकरी व आरोग्य विभागात आरोग्यसेवक पदावर कार्यरत असलेले सुनील गिरधर पाटील (वय ४७) यांनी स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, सुनील गिरधर पाटील हे आरोग्य विभागात आरोग्यसेवक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती शिंदाड येथे आहे. गुरुवारी ३१ रोजी सुनील पाटील हे दुपारी १ वाजेच्या सुमारास स्वत:च्या शेतात गेले असता शेतातील झाडाला दोरी बांधून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
मात्र पाचोरा येथे घर घेण्यासाठी कर्ज घेतले होते व त्यातच शेतात उत्पन्न आले नाही. किरकोळ कर्ज अशा कारणाने वैफल्यग्रस्त होऊन सुनील याने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. मयताच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पिंपळगाव हरे. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.