हॉटेलचालक तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2017 00:53 IST2017-01-04T00:53:59+5:302017-01-04T00:53:59+5:30
बोदवड : हॉटेलचे मालक राजेश घनश्याम फबियाणी (वय ३५) यांनी ३ रोजी पहाटे दुकानाच्या वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली़

हॉटेलचालक तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
बोदवड : शहरातील दिलीप हॉटेलचे मालक तथा विवाहित तरुण राजेश घनश्याम फबियाणी (वय ३५) यांनी ३ रोजी पहाटे दुकानाच्या वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली़
फबियाणी कुटुंबियात गत तीन वर्षातील सदस्याने आत्महत्या करण्याची ही दुसरी वेळ आहे़ या घटनेने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. तीन वर्षापूर्वी राजेशच्या मोठ्या भावाने आत्महत्या केली होती तर मंगळवारी राजेशने आत्महत्या केल्याची बाब उघड झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली़ त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली व मुलगा असा परिवार आहे़
याबाबत कुटुंबातील रमेश देवीदास फबियाणी यांनी बोदवड पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (वार्ताहर)