अमळनेर तालुक्यात दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 18:02 IST2020-08-05T18:02:04+5:302020-08-05T18:02:31+5:30

अमळनेर तालुक्यात शिरसाळे आणि हिंगोणे येथे दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

Suicide by hanging of two in Amalner taluka | अमळनेर तालुक्यात दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर तालुक्यात दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर : तालुक्यात शिरसाळे आणि हिंगोणे येथे दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. एक घटना ५ रोजी, तर दुसरी घटना ४ रोजी सायंकाळी घडली.
शिरसाळे येथील फारुख अल्लाउद्दीन खाटीक यांनी फिर्याद दिली की, साहिल भिकान खाटीक (२१) या तरुणाने गावाला लागून असलेल्या स्मशानभूमीजवळील जगन्नाथ जीवन पाटील यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ५ रोजी सकाळी सहापूर्वी घडली.
हिंगोणे खुर्द शिवारात प्रवीण तुकाराम कोळी (३२) याने निंबाच्या झाडाला साडी बांधून गळफास घेतला. प्रवीण दगाजी पाटील यांच्या शेतात ४ रोजी सायंकाळी साडेपाचला ही घटना घडली. लक्ष्मण भगवान कोळी यांनी मारवड पोलिसांना माहिती दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास किशोर पाटील करीत आहे.

Web Title: Suicide by hanging of two in Amalner taluka