दरेगाव येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 21:52 IST2020-01-14T21:51:56+5:302020-01-14T21:52:44+5:30
दरेगाव येथील कर्जबाजारी शेतकºयाने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ रोजी सकाळी नऊला घडली.

दरेगाव येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यातील दरेगाव येथील कर्जबाजारी शेतकºयाने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ रोजी सकाळी नऊला घडली. आत्माराम एकनाथ पाटील (वय ६०) असे या शेतकºयाचे नाव आहे.
ते सकाळी दरेगाव शिवारातील शेतात गेल्यानंतर झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. सततच्या नापिकीला शेतकरी कंटाळला होता. त्यात सोसायटी, बँक आणि हातऊसनवारीच्या कर्जामुळे त्रस्त होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून व नातवंडे असा परिवार आहे. ते विनोद पाटील यांचे वडील होत. याबाबत मारवड पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास एपीआय राहुल फुला यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार व विजय साळुंखे करीत आहेत.