सिल्लोडच्या डॉक्टरची जळगावात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:15 IST2020-02-12T23:15:32+5:302020-02-12T23:15:36+5:30

जळगाव : शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या विजय नारायण जाधव (२६, रा. सिल्लोड, जि.औरंगाबाद, ह.मु.जळगाव) या तरुण डॉक्टरने राहत्या ...

The suicide of a cillod doctor in jalgaon | सिल्लोडच्या डॉक्टरची जळगावात आत्महत्या

सिल्लोडच्या डॉक्टरची जळगावात आत्महत्या

जळगाव : शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या विजय नारायण जाधव (२६, रा. सिल्लोड, जि.औरंगाबाद, ह.मु.जळगाव) या तरुण डॉक्टरने राहत्या घरात बारीक तारेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी सात वाजता उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.विजय जाधव यांचे बी.ए.एम.एस.चे शिक्षण झाले असून दीड वर्षापासून ते रिंगरोड येथे भाड्याच्या घरात वास्तव्याला होते. तसेच  गांधी नगरातील मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस करीत होते. बुधवारी दुपारी तीन वाजेपासून कुटुंब त्यांच्याशी संपर्क साधत होते, मात्र मोबाईल बंद येत होता.त्यामुळे जळगावातील मित्र डॉ. गिरीश पाटील यांच्याशी कुटुंबाने संपर्क साधला. त्यांनी घरी जावून पाहिले तर डॉ.विजय यांनी घरात इमारतीच्या हुकला तार अडकवून गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी हा प्रकार जिल्हा पेठ पोलिसांना कळविला.

याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The suicide of a cillod doctor in jalgaon