शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात इमारतीवरुन पडून वैद्यकिय प्रतिनिधीचा मृत्यू, अपघात की आत्महत्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 15:15 IST

बी.जे.नगरातील घटना : पहाटे चार वाजता उघडकीस आला प्रकार

जळगाव : अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन पडल्याने विजय प्रल्हाद शिनकर (४८, मुळ रा.वरणगाव, ता.भुसावळ) यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे चार वाजता गुड्डूराजा नगराला लागून असलेल्या बी.जे.नगरात उघडकीस आली. ही घटना आत्महत्या आहे की तोल जावून पडल्याने मृत्यू हे स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  बी.जे.नगरातील सिध्दांत अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर विजय शिनकर हे पत्नी कल्पना, मुलगी श्रध्दा व मुलगा सारंग असे चौघे वास्तव्याला होते. शिनकर हे वैद्यकिय प्रतिनिधी (एम.आर) म्हणून काम करायचे. दोन वर्षापूर्वीच ते वरणगाव येथून जळगावात स्थायिक झाले. सिध्दांत अपार्टमेंटमध्ये त्यांनी स्वत:चा फ्लॅट घेतलेला होता. शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत पत्नी व दोन्ही मुलांशी त्यांनी गप्पा मारल्या. त्यानंतर सर्व जण झोपले. शनिवारी पहाटे चार वाजता मुलगा सारंग हा लघुशंकेसाठी उठला असता वडील जागेवर दिसले नाहीत. बाथरुमध्येही नसल्याने तो इमारतीच्या गच्चीवर बघायला गेला, तेथेही ते नव्हते. त्यामुळे त्याने बहिण श्रध्दा हिला उठवले व दोघं जण खाली आले असता वडील रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून त्यांनी आरडाओरड केली. पत्नी व शेजारच्या लोकांनी धाव घेऊन त्यांना तातडीने शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. 

टॅग्स :JalgaonजळगावDeathमृत्यूMedicalवैद्यकीय