शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

नवीदाभाडीतील पीडितेच्या आत्महत्या प्रकरणात कलम वाढविण्याच्या सूचना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 10:06 PM

पत्रकार परिषद : राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांची माहिती  जळगाव : जामनेर तालुक्यातील नवीदाभाडी येथे  मुलीच्या आत्महत्येप्रकरणात ...

पत्रकार परिषद : राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांची माहिती जळगाव : जामनेर तालुक्यातील नवीदाभाडी येथे  मुलीच्या आत्महत्येप्रकरणात ३२५ हे कलम लावलेले नव्हते. ही बाब लक्षात आल्याने या प्रकरणात हे कलम वाढविण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या असल्याची माहिती  राष्ट्रीय अनुसुचित आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी दिली. या सोबतच या नवीदाभाडी व मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील प्रकरणांमध्ये पीडित मुलींच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य दिल्याचेही त्यांनी सांगितले.  जिल्ह्यात दोन ठिकाणी मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. याची दखल घेत राष्ट्रीय अनुसुचित आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी शुक्रवार, २६ फेब्रुवारी रोजी या दोन्ही ठिकाणी भेट देऊन कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यानंतर जळगावात पत्रकार परिषद घेत या विषयी माहिती दिली. या वेळी आयोगाच्या सहायक निर्देशक अनुराधा दुसाने, समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील आदी उपस्थित होते. नवीदाभाडी, ता.जामनेर येथील मुलीने गावातील दोन तरुणांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी घडली होती.  या प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली व त्यांच्याविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची राष्ट्रीय अनुसुचित आयोगाने दखल घेतली व शुक्रवारी तेथे आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी भेट दिली. या दरम्यान  सदर प्रकरणामध्ये पोलिसांनी ३२५ (हाणामारी, जखम करणे) हे कलम लावलेले नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे या प्रकरणात हे कलम वाढविण्याची सूचना पोलिसांना दिली असल्याची माहिती पारधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अत्याचारग्रस्त पीडीतेच्या कुटुंबियांस मदत म्हणून सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आठ लाख २५ हजार रुपये मंजूर करण्यात आले असून त्या पैकी चार लाख १२ हजार ५०० रुपयांचा धनादेश कुटुंबीयांना देण्यात आल्याचेही पारधी यांनी या वेळी सांगितले. 

परप्रांतातील मुलीलाही मदतउचंदा, ता.मुक्ताईनगर येथे मध्यप्रदेशातील युवती मावशीकडे आली असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. तिच्याही कुटुंबियांची पारधी यांनी भेट घेवून  दोन लाखांचा धनादेश देण्यात आल्याचे पारधी यांनी सांगितले. या मुलीच्या कुटुंबीयास मदत म्हणून चार लाख रुपये मंजूर केले असून ही मुलगी मध्यप्रदेशातील असली तरी ही घटना आपल्या राज्यात घडल्याने तिलाही मदत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

गुन्हेगार सुटू नये यासाठी पोलिसांचे प्रयत्न आवश्यकमुलींवर होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या घटना दुर्दैवी असून अशा घटनांमध्ये पीडीत, तिचे कुटुंबीय यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोगाचा प्रयत्न राहणार असे, पारधी यांनी सांगितले. अशा घटनांमध्ये गुन्हेगार सुटू नये म्हणून पोलिसांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही पारधी यांनी नमूद केले. 

कुटुंबाला न्यायाची अपेक्षानवीदाभाडी व उचंदा येथील कुटुंबीयांच्या भेटी दरम्यान त्यांना आर्थिक मदत देण्यात आली. या सोबतच या कुटुंबीयांनी आम्हाला, न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी केली असल्याचे पारधी म्हणाले. त्यांच्या मागणीनुसार अशा प्रकरणांमध्ये न्याय देण्यासाठी आयोगाचे प्रयत्न राहणार असल्याचे पारधी म्हणाले. 

टॅग्स :Jalgaonजळगाव