ऊस आणि ठिबक संच आगीत जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 16:23 IST2019-06-13T15:43:40+5:302019-06-13T16:23:41+5:30
३ लाखांचे नुकसान : भङगाव तालुक्यातील लोण पिराचे शिवारातील घटना

ऊस आणि ठिबक संच आगीत जळून खाक
भडगाव : तालुक्यातील लोण पिराचे शिवारातील मधुकर गिरधर पाटील या शेतकऱ्याचे साडेतीन एकर ऊसाचे पीक तसेच ठिबक संच आगीत जळुन खाक झाले. ही घटना १२ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास विजतारांमुळे घडली. या घटनेचा महसूल विभागाने सुमारे ३ लाखांचा नुकसानीचा पंचनामा केला आहे. याच परीसरात १० रोजी सायंकाळी जोरदार वादळासह पावसाने केळी बागांसह घरांचे कोटयवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे मधुकर गिरधर पाटील यांचे नुकसान झाले. गोंडगाव वीज वितरण कंपनीचे इंजिनियर एस. एच. दहीवले यांनी घटनास्थळी भेट देउन पाहणी केली. शासनाने तत्काळ मदतीचा हात द्यावा, अशी मागणी नुकसानधारक शेतकरी वर्गातून होत आहे.