वसंतवाडी येथे तरुणाचा अचानक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 13:09 IST2019-10-22T13:09:04+5:302019-10-22T13:09:31+5:30

मृत्यूचे कारण अस्पष्ट

Sudden death of a young man at Vasantwadi | वसंतवाडी येथे तरुणाचा अचानक मृत्यू

वसंतवाडी येथे तरुणाचा अचानक मृत्यू

जळगाव : तालुक्यातील वसंतवाडी येथे अंगणाबाहेर थांबलेल्या विनोद अशोक पाटील (२९) या तरुणाचा अचानक जमिनीवर कोसळून मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री साडे आठ वाजता घडली. विनोद याचे मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद हा रिक्षा चालक असून रविवारी रात्री साडे आठ वाजता तो घराबाहेर उभा होता, तेव्हा त्याला अचानक भोवळ आली. जागेवरच बेशुध्द झाल्याने प्रवीण रामदास पाटील व इतर नातेवाईकांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.
सोमवारी सकाळी पंचनामा व शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
विनोद पाटील याच्या पश्चात आई नबाबाई, वडील अशोक पोपट पाटील, पत्नी सोनाली, मुलगी जान्हवी (७), मुलगा सागर (५), भाऊ समाधान, धनराज व मोहन असा परिवार आहे. दोघं भाऊ विवाहित असून मोहन अविवाहित आहे.
काही दिवसापासून होता तणावात
काही दिवसापासून विनोद हा तणावात होता, अशीही माहिती नातेवाईकांकडून मिळाली.

Web Title: Sudden death of a young man at Vasantwadi

टॅग्स :Jalgaonजळगाव