चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोशल डिस्टंसिंगची ऐसी तैसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 18:52 IST2020-04-03T18:50:42+5:302020-04-03T18:52:34+5:30
चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत लॉकडाऊन व सोशल डिस्टनसिंगची ऐसी तैसी झाल्याचे पहायला मिळत आहे.

चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोशल डिस्टंसिंगची ऐसी तैसी
संजय सोनवणे
चोपडा, जि.जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लॉकडाऊन व सोशल डिस्टनसिंगची ऐसी तैसी झाल्याचे पहायला मिळत आहे. तहसीलदार अनिल गावित यांच्यासमोर पायमल्ली झाल्याचा अनुभव आला. तशातच शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या शेतीमालाचा लिलाव करण्यात आला. बाजार समिती प्रशासनाकडून गर्दी कमी करा, असे सांगण्यात येत होते. मात्र जनता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.
एकाच दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० ट्रॅक्टर गहू, दादर आणि हरभरा विक्रीसाठी आणले. शेकडो लोकांची गर्दी झाली आणि शेती माल विकत घेण्यासाठी घरगुती लोकांनीही धान्य घेण्यासाठी बाजार समितीत एकच गर्दी केल्याने कलम १४४ ची पायमल्ली करण्यात आली.
तहसीलदार अनिल गावीत हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आले असताना त्यांच्या डोळ्यासमोर कायद्याची पायमल्ली झाली. तरी त्यांनी बाजार समिती प्रशासन अथवा पोलीस प्रशासनास जाब विचारण्याची तसदीही घेतली नाही.त् यामुळे घरात बसून लॉकडाऊन पाळणाºयांनी कितीही पाळले तरी अशी स्थिती राहिली तरी उपयोग काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.