शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

नरेंद्र मोदी विरुद्ध संविधान अशीच लढाई - छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 23:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर केली टीका

अमळनेर : राज्यसभेत बहुमत असते तर संविधान बदलवून टाकू, असे बोलणारे नेते भाजपात आहेत. त्यांना संविधान मंजूर नाही, फक्त मनुवाद पसरवला जात असून या सरकारमुळे देशात असंवेदनशीलता वाढली आहे. निर्धार परिवर्तन यात्रेचा उद्देशच केवळ मोदी विरुद्ध संविधान अशीच लढाई आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.चोपडा येथून निर्धार परिवर्तन यात्रा आटोपून नाशिक परत जात असताना येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांच्या निवासस्थानी छगन भुजबळ यांनी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी वरील टीका केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील, तिलोत्तमा पाटील, शिवाजी पाटील, सचिन पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले की, राज्यसभेत बहुमत असते तर संविधान बदलवून टाकू, असे बोलणारे नेते भाजपात आहेत. त्यांना संविधान मंजूर नाही, फक्त मनुवाद पसरवला जात असल्याचे सांगत या सरकारमुळे देशात असंवेदनशीलता वाढल्याचा आरोपही केला. या सरकारच्या काळात विचार स्वातंत्र्य नष्ट झाल्याचेही भुजबळ म्हणाले.आरक्षण हा ‘चुनावी जुमला’परिवर्तन यात्रेला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश याठिकाणी जशी हवा बदलली आहे तशीच हवा महाराष्ट्रात बदलली आहे. मोदींचा प्रभाव कमी झाला आहे, लोक ‘अच्छे दिन’ची आता टिंगल उडवत आहेत. चार-पाच राज्यात पराभव झाल्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आमिषे दाखवायला त्यांनी सुरुवात केल्याचे सांगत, आरक्षण हा ‘चुनावी जुमला’ असल्याचे भुजबळ म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणला पहिल्यापासून पाठिंबा देत होतो इतकेच नाही तर संसदेची मंजुरी मिळवून आणा याचा फायदा पाटीदार, पटेल, जाट यासारख्या देशभर पसरलेल्या समाजालादेखील होईल व त्यांचा सुद्धा प्रश्न सुटेल. आरक्षण हा मुद्दा केवळ निवडणूक डोळ््यापुढे ठेऊन देण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.विकासाचे काहीच बोलत नाहीआरक्षण ५० टक्यांच्यावर दिले जाऊ नये, असे २०१४ मध्ये सांगणारे आता आरक्षण देत असल्याचेही भुजबळ म्हणाले. गेल्या वेळी मी गुजरातचा विकास केला आहे, त्यामुळे देशाचा विकास करण्यासाठी मला मतदान करा, असे सांगणारे मोदी आता विकासाचे काही बोलत नाही, आता तेही लढाई जनता विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचे सांगतात. म्हणजे यातून मोदीही गेले आणि विकासही गेला. आता त्यांनी जनतेला यात ओढले असल्याची टीका त्यांनी केली.पत्रकारांच्या लेखणीवर बंधनमहागाई, पेट्रोल या सारखी चुनावी जुमला सांगून मतदान घेतले, आता देशात मुस्लीम, दलितांवर अन्याय केला जात आहे, विकासाचा कुठेच पत्ता नाही. भ्रष्टाचाराचे अवडंबर केले होते, राफेल साडे पाचशे कोटीचे साडे सोळाशे कोटी का दिले आणि अंबानींनी काय दिले याचे उत्तर अजून दिलेले नाही. वैचारिक स्वातंत्र्यावर बंदी घातली गेली, पत्रकारांनी काय लिहावे यावर बंधन आहे. मोठ्या पत्रकारांचे काय झाले, नयनतारा सहगल यांना अडविले, कारण ही मंडळी भाजपवर टीका करणारी होती, अशा विविध मुद्यांवर भुजबळ यांनी टीका.

टॅग्स :Jalgaonजळगाव