संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे कराटे स्पर्धेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST2021-02-05T05:53:10+5:302021-02-05T05:53:10+5:30
जळगाव : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात संत ज्ञानेश्वर ...

संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे कराटे स्पर्धेत यश
जळगाव : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय संचालित, कराटे शिबिरात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. त्याबद्दल त्यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला .
स्पर्धेत सुवर्ण पदक प्रणिता कडू साळुंके, सकलेन लतीफुद्दीन पिरजादे, अहेतेसब लतीफुद्दीन पिरजादे, साई दत्तू माळी यांना मिळाले, तसेच रौप्य पदक हृषीकेश संजय मांडोळे, दीपाली मधुकर सावकारे, सैफ लतीफुद्दीन पिरजादे या विद्यार्थ्यांनी पटकावले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संत ज्ञानेश्वर महाराज कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक प्रशांत नाईक व सचिव मुकेश नाईक यांनी केला. विद्यार्थ्यांना, मुख्य कराटे प्रशिक्षक ज्ञानेश्वर पवार यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. सहायक कराटे प्रशिक्षिका प्रज्ञा बोदडे यांनी आभार मानले.