स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी संकल्पना समजणे, आत्मविश्वास वाढविणे आवश्यक : यजुवेंद्र महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:42 AM2019-12-11T00:42:10+5:302019-12-11T00:44:29+5:30

स्पर्धा परीक्षा व जीवनात यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना समजणे, स्वत:चा आत्मविश्वास वाढविणे आवश्यक असल्याचे मत दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुवेंद्र महाजन यांनी व्यक्त केले.

To succeed in competitive exams, it is important to understand the concepts, build confidence: Yajuvendra Mahajan | स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी संकल्पना समजणे, आत्मविश्वास वाढविणे आवश्यक : यजुवेंद्र महाजन

स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी संकल्पना समजणे, आत्मविश्वास वाढविणे आवश्यक : यजुवेंद्र महाजन

Next

जामनेर, जि.जळगाव : स्पर्धा परीक्षा व जीवनात यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना समजणे, स्वत:चा आत्मविश्वास वाढविणे आवश्यक असल्याचे मत दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुवेंद्र महाजन यांनी एकलव्य शाळेत आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात व्यक्त केले.
सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकलव्य शाळेचे ज्येष्ठ संचालक अ‍ॅड.शिवाजी सोनार, तर प्रमुख पाहुणे म्हणून उमविचे व्यवस्थापन सदस्य दीपक पाटील, तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, गटनेता प्रशांत भोंडे, अभय बोहरा, किशोर महाजन, सिध्दार्थ पाटील व प्राजक्ता पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना महाजन म्हणाले की, स्पर्धा परीक्षांमध्ये मूळ संकल्पना समजून स्वत:शीच स्पर्धा करा. पालकांनी घरात खेळीमेळीचे वातावरणात ठेवून कोणतीच अपेक्षा न ठेवता मुलांना शिक्षित करा. परीक्षा ही आपल्या गुणांना वाव देण्याची संधी देते.
यावेळी आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल जडे यांनी केले, तर प्रास्ताविक सिद्धार्थ पाटील यांनी केले.

Web Title: To succeed in competitive exams, it is important to understand the concepts, build confidence: Yajuvendra Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.