शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
2
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
3
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
4
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
5
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
6
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
7
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
8
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
9
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
10
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
11
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
12
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
13
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
14
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
15
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
16
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
17
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
18
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
19
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
20
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
Daily Top 2Weekly Top 5

गिरीश महाजनांचा अभ्यास कच्चा - खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 13:12 IST

तत्काळ दुष्काळ जाहीर करा

ठळक मुद्देतीन मुद्दे चर्चेतभारनियमन सरकारच्या धोरणामुळे

जळगाव : महात्मा गांधी हे भाजपा विचाराचे असे जलसंपदा मंत्री म्हणतात, त्यांचा अभ्यास कच्चा आहे. त्यांच्या पक्षाची पितृ संस्था राष्टÑीय स्वयंसेवक संघ आहे. संघाचा काय विचार आहे? याचा त्यांना अभ्यास नसल्याची टीका राष्टÑवादी कॉँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत केली.खासदार सुळे या गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात आहेत. गुरूवारी यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात शहरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.तीन मुद्दे चर्चेतराज्यात सध्या तीन मुद्दे चर्चेत असल्याचे खासदार सुळे म्हणाल्या, यात राज्यातील मराठवाडा, उत्तर महाराष्टÑ विदर्भातील काही भागात पाऊस कमी झाल्याने दुष्काळी स्थिती आतापासून आहे. यासह महिला सुरक्षा, हमीभावाबाबत दुर्लक्ष यामुळे जनता भयभित आहे. दुसरीकडे हे सरकार दुर्लक्ष करीत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात दुष्काळ नाही, किती हा असंवेदशिलपणा. ३१ आॅक्टोबर म्हणजे अजून तीन आठवडे बाकी आहेत. इतकी वाट का पहायची. केवळ वेळ काढूपणा हे सरकार करीत आहे.भारनियमन सरकारच्या धोरणामुळेअचानक जनतेला भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. या स्थितीलाही हे सरकार जबाबादार आहे. नियोजन व्यवस्थित न केल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे त्या म्हणाल्या. पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्तीबाबतच्या याचिकेत सरकारकडून व्यवस्थित भूमिका मांडली न गेल्याने अनेकांना त्रास झाला आहे. एकीकडे बेरोजगारी वाढत असताना अशा प्रकारची भूमिका योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या.सत्तेची मस्ती जनता उतरवेलराज्यातील सरकारला सत्तेची मस्ती आली असून ही मस्ती जनता येत्या निवडणुकांमध्ये उतरविल्याशिवाय रहाणार नाही असेही खासदार सुळे म्हणाल्या.यावेळी व्यावसपीठावर त्यांच्यासह माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, महानगर जिल्हाध्यक्ष नामदेव चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, महानगर महिला अध्यक्षा निला चौधरी, जिल्हा बॅँकेच्या संचालक तिलोत्तमा पाटील, माजी जिल्हाध्यक्षा विजया पाटील, प्रदेश उपाध्यक्षा मंगला पाटील, युवती अध्यक्षा कल्पिता पाटील, जिल्हा कार्याध्यक्षा मिनल पाटील, युवक अध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शून्यातून सुरूवात करानुकत्याच काही निवडणुकांमध्ये पक्षाला येथे यश मिळाले नाही. हरकत नाही पण तुम्हाला आता शून्यातून सुरूवात करावी लागेल असा सल्लाही नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांना सुळे यांनी देऊन जनतेच्या कामांसाठी रस्त्त्यावर या तर जनता तुमच्या बरोबर येईल असा सल्लाही सुळे यांनी यावेळी दिला.सत्ताधाºयांनी बोलताना भान ठेवावे...गिरीश महाजन यांच्यावर टिका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या अन्य पक्षांचा सफाया करण्याची भाषा ते करतात. त्यांना बोलण्याचे अधिकार आहेत पण काही मर्यादा आहे की नाही? आज राज्यात बरेच सत्ताधारी काहीही विधान करीत आहेत. मुलगी पळवून नेण्यासाठी मदतीची भाषा करतात पण गृहमंत्र्यालय काहीही करत नाही. असे वागणे म्हणजे सत्तेची मस्ती आल्याचाच प्रकार आहे.डॉ. राजेश पाटील राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेशखान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून महापालिकेत स्विकृत सदस्य म्हणून काम केलेले व आयएमएचे राज्याचे सहसचिव डॉ. राजेश पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूकांची चाचपणी झाली. यात मुलाखतीस डॉ. पाटील हेदेखील उपस्थित होते. ते लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.जळगाव खड्ड्यांचे शहरखासदार सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी दौरा केला ते औरंगाबाद शहर अस्वच्छ शहर आहे तर जळगाव हे खड्डयांचे शहर आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव