हरिविठ्ठल नगरातून विद्यार्थ्याची दुचाकी लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:13 IST2020-12-26T04:13:11+5:302020-12-26T04:13:11+5:30

जळगाव : हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या भूषण सावंदे या विद्यार्थ्यांची घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी ...

The student's two-wheeler was removed from Harivitthal town | हरिविठ्ठल नगरातून विद्यार्थ्याची दुचाकी लांबविली

हरिविठ्ठल नगरातून विद्यार्थ्याची दुचाकी लांबविली

जळगाव : हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या भूषण सावंदे या विद्यार्थ्यांची घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजता उघडकीला आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

भूषण सावंदे हा आयटीआयचे शिक्षण घेत आहे. महाविद्यालयात जाण्यासाठी त्याच्याकडे एमएच. १९. डीई ५७०५ क्रमांकाची दुचाकी आहे. २४ डिसेंबर रोजी दुचाकी घरासमोर पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास दुचाकी जागेवर होती. मात्र, शुक्रवारी सकाळी ६ वाजता जाग आल्यानंतर घराबाहेर दुचाकी आढळून आली नाही. परिसरात शोध घेऊन दुचाकी मिळून न आल्याने रामानंद नगर पोलिसात धाव घेतली. भूषण सावंदे यांनी रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुध्द तक्रार दाखल केली आहे.

Web Title: The student's two-wheeler was removed from Harivitthal town