विद्यार्थ्यांनी संवाद वाढवून सलोखा जोपासावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:00 IST2021-02-05T06:00:01+5:302021-02-05T06:00:01+5:30
जळगाव : महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी एकमेकांशी बोलावे, संवाद वाढवा, मैत्रीपूर्ण सलोखा जोपासून शिस्त व नियोजनबद्ध शिक्षण घ्यावे, असे आवाहन शासकीय ...

विद्यार्थ्यांनी संवाद वाढवून सलोखा जोपासावा
जळगाव : महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी एकमेकांशी बोलावे, संवाद वाढवा, मैत्रीपूर्ण सलोखा जोपासून शिस्त व नियोजनबद्ध शिक्षण घ्यावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी विद्यार्थ्यांना केले.
प्रथम वर्षाच्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभात ते बोलत होते. जीएमसीत प्रथम व द्वितीय वर्षाच्या तासिका सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अनेक दिवसांनंतर विद्यालयाचा परिसर विद्यार्थ्यांमुळे गजबजला आहे.
उप अधिष्ठाता (पदव्युत्तर) डॉ. मारोती पोटे, उप अधिष्ठाता (पदवीपूर्व) डॉ. अरुण कासोटे, शरीरक्रियाशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. योगिता सुलक्षणे, जनऔषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. बीना कुरील, जीव रसायनशास्त्र विभागाच्या डॉ. धनश्री चौधरी उपस्थित होते. डॉ. कासोटे यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना रॅगिंग प्रतिबंधक समितीची, वसतिगृहाची माहिती इतर प्राध्यापकांनी दिली. तसेच प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. डॉ. मोनिका युनाती यांनी सूत्रसंचालन केले तर आभार डॉ. धनश्री चौधरी यांनी मानले.