कजगाव येथील विद्यार्थी २५ वर्षांनंतर एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:58 IST2019-11-01T15:58:06+5:302019-11-01T15:58:27+5:30
ब. ज. हिरण विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ३० रोजी पार पडला.

कजगाव येथील विद्यार्थी २५ वर्षांनंतर एकत्र
कजगाव ता. भडगाव, जि.जळगाव : येथील ब. ज. हिरण विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ३० रोजी भडगाव रस्त्यावरील राजकुंवर मंगल कार्यालयात पार पडला.
येथील १९९४ व १९९५ च्या दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. सर्वांचे मोबाईल नंबर उपलब्ध करुन एक व्हाट्सप ग्रुप तयार करण्यात आला व सर्वांना नियोजित कार्यक्रमस्थळी हजर राहण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे १९९४ व १९९५ वर्षाच्या दहावीच्या वर्गातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी स्नेहमेळाव्यात जमले.
यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटत होते. जणू सर्व विद्यार्थी आपल्या पूर्वीच्या आठवणीतच हरवले होते. सर्वांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व मोठ्या उत्साहात स्नेह मेळावा पार पडला.
यावेळी अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक व्ही.टी.वाणी होते. मुख्याध्यापक परमेश्वर मोरे, व्ही. एस. अमृते, ए. डी. पाटील, पी. सी. पाटील, बी. जे. पाटील, एस. के .पाटील, एस. बी. पवार, बी. के. पाटील, एस. एम .जैन, डी. पी .पाटील, एम. जी. पाटील, आर. डी. पाटील, एच. जे. पाटील व १९९४ व १९९५ च्या वर्षातील सर्वच शिक्षक उपस्थित होते व माजी विद्यार्थ्यामधून मंगलसिंग राजपूत, धीरज पाटील, योगेश पाटील, असिफ मणियार, उमेश वाणी, नीलेश महाजन, अमोल न्याती, अशोक महाजन, रफिक बागवान, संग्राम राजपूत, सविता जैन, अनिता जोशी, पूनम अमृतकर, तब्बू शेख, सुरेखा ठोके आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांनप्रति प्रेम व्यक्त केले व त्या काळातील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या नात्यांचा गौरव करून आपल्या मनोगतात विविध गोष्टींना उजाळा दिला तर अनेक विद्यार्थ्यांनीही आपल्या गुरुजांना प्रति कृतज्ञता व्यक्त करून मनोगते व्यक्त केली. यावेळी शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्याही चेहºयावर एकमेकांविषयी आदर व्यक्त करत भावनिक वातावरण तयार झाले होते.