शाळेच्या पहिल्या दिवशी चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2023 13:04 IST2023-06-12T13:03:46+5:302023-06-12T13:04:58+5:30

शाळेच्या पहिल्या दिवशी प्रार्थनेच्यावेळी चक्कर येऊन पडल्याने आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

student dies after fainting on first day of school | शाळेच्या पहिल्या दिवशी चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेच्या पहिल्या दिवशी चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

नरेंंद्र पाटील, भुसावळ जि.जळगाव : शाळेच्या पहिल्या दिवशी प्रार्थनेच्यावेळी चक्कर येऊन पडल्याने आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना भुसावळ येथील  डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोमवारी सकाळी ८ वाजता घडली. सुयोग भूषण बडगुजर (१३) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. 

सोमवार हा शाळा सुरू होण्याचा पहिला दिवस. सर्व मित्र भेटणार या आनंदात मुले शाळेत आली. प्रार्थना सुरू असतानाच  आठवीमधील सुयोग  बडगुजर या विद्यार्थ्याला चक्कर आली. तो खाली पडला. शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ खासगी दवाखान्यात नेले.  मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. सुयोगच्या वडीलांचे आठ महिन्यापूर्वी निधन झाले आहे.  त्याच्या पश्चात आजी, आई आणि बहिण असा परिवार आहे.

Web Title: student dies after fainting on first day of school

टॅग्स :Jalgaonजळगाव