प्रेमविवाहानंतर परतलेल्या दाम्पत्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:18 IST2019-05-20T00:14:56+5:302019-05-20T00:18:33+5:30
भुसावळ येथील युवतीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग आल्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी मुलीसह तिचा पती, दीर व सासू यांना बेदम मारहाण केली. ही घटना १९ रोजी दुपारी एकला घडली.

प्रेमविवाहानंतर परतलेल्या दाम्पत्यास मारहाण
भुसावळ, जि.जळगाव : येथील जामनेर रोडवरील कृष्णा नगरातील रहिवासी युवतीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग आल्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी मुलीसह तिचा पती, दीर व सासू यांना बेदम मारहाण केली. ही घटना १९ रोजी दुपारी एकला घडली. त्या विवाहितेच्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलिसात माहेरच्या १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
फिर्यादू मोना नितीन कांडेलकर (रा.कृष्णानगर, भुसावळ) या तरुणीने कृष्णा नगरमधील रहिवासी नितीन मधुकर कांडेलकर याच्याशी २१ आॅक्टोबर २०१८ रोजी भुसावळ न्यायालयात रजिस्टर विवाह केला आहे. तेव्हापासून ती पतीसोबत बाहेरगावी राहत होती. ती नितीन कांडेलकर यांच्यापासून आठ महिन्याची गर्भवती असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. मोना ही पतीसह १८ मे रोजी भुसावळ येथे आली. ही माहिती तिच्या नातेवाईकांना मिळाली. त्यामुळे आरोपी नवलसिंग मंजुसिंग भाडिया (रा.हरदा, मध्य प्रदेश), दीपसिंग तेजसिंग बावरा, बाबूसिंग दीपसिंग बावरा, प्रतापसिंग दरबारसिंग बाटिया, मंगलसिंग चंदासिंग छाबडा, अवतारसिंग दर्शनसिंग बाटिया, चंदनकौर मंगलहसिंग छाबडा, छायाकौर प्रधानसिंग बावरा, कुलजितसिंग मंगलसिंग बावरा, मोनुसिंग दीपसिंग बावरा, जतेसिंग गुमानसिंग बावरा, प्रधानसिंग चंदनसिंग बावरा व बलजितसिंग बावरा (सर्व रा.भुसावळ) यांनी १९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरी जाऊन शिवीगाळ व मारहाण केली. ती गर्भवती असतानाही तिच्या पोटात लाथ मारली. ही माहिती पती नितीन कांडेलक व दीर व सासू यांना मिळताच ते घरी आले. त्यावेळी आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. यासंदर्भात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास एपीआय सारिका खैरनार करीत आहे.