अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:20 IST2021-09-22T04:20:38+5:302021-09-22T04:20:38+5:30
जळगाव : अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने जिल्हाभरात संप पुकारला होता. नोंदणी आणि मुद्रांक विभागातील सर्व संवर्गांतील रखडलेल्या पदोन्नती ...

अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संप
जळगाव : अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने जिल्हाभरात संप पुकारला होता. नोंदणी आणि मुद्रांक विभागातील सर्व संवर्गांतील रखडलेल्या पदोन्नती आणि इतर विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता. मंगळवारी राज्यभरात हा संप पुकारला होता. त्यात जळगाव जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी पदोन्नतीचा कार्यवाही झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू न करणे, विभागातील सर्व रिक्त पदे तत्काळ भरणे, विभागातील वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक यांच्या ज्येष्ठता याद्या प्रलंबित आहेत. त्या अंतिम करून प्रसिद्ध करणे, मुंबई शहरातील रिक्त मुद्रांक जिल्हाधिकारी पदे भरणे, कोविडमुळे मृत्यू झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कुटुंबांना तत्काळ ५० लाखांची मदत करणे, तुकडे बंदी आणि रेरा कायद्यानुसार नोंदणी विभागातील अधिकारी यांच्यावरील कारवाई मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
खरेदी-विक्री व्यवहार बंद
जिल्ह्यातील सर्व मुद्रांक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने खरेदी-विक्री व्यवहार ठप्प झाले होते.