शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

बोदवड न.पं.च्या खुल्या भूखंडावर शाळेचे पक्के अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:37 AM

बोदवड शहरातील नाडगाव रस्त्यावर पडलेल्या प्लॉटमधील गट क्र.२२९/१ मध्ये इंग्रजी माध्यमाची सुरू असलेल्या शाळेसमोर असलेल्या खुल्या भूखंडावर वर्गखोल्यांचे पक्के अतिक्रमण करण्यात आले आहे. या बांधकामाला कोणाचा वरदहस्त लाभला आहे, असा सवाल जाणकारांकडून केला जात आहे.

ठळक मुद्देपालिकेच्या मालकीच्या खुल्या भूखंडावर पक्के अतिक्रमण करून जागा हडप करण्याचा प्रकारबांधकामाला कोणाचा वरदहस्त? असा सवाल जाणकारांकडून केला जात आहे.

बोदवड, जि. जळगाव : एकीकडे बोदवड नगरपंचायत झाल्याने घर बांधकामाला ना हरकतीचा दाखला मिळण्यासाठी तसेच आराखड्याकरीता घेतला जाणारा कर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असताना नगर पंचायतीच्या नाकावर टिच्चून शहरातील नाडगाव रस्त्यावर पडलेल्या प्लॉटमधील गट क्र.२२९/१ मध्ये इंग्रजी माध्यमाची सुरू असलेल्या शाळेसमोर असलेल्या खुल्या भूखंडावर वर्गखोल्यांचे पक्के अतिक्रमण करण्यात आले आहे. या बांधकामाला कोणाचा वरदहस्त लाभला आहे, असा सवाल जाणकारांकडून केला जात आहे.सूत्रानुसार, नाडगाव रस्त्यावर रेव्ह. सेंट पीटर इंग्लिश स्कुल असून या शाळेने याच गटातील पालिकेच्या मालकीच्या खुल्या भूखंडावर पक्के अतिक्रमण करून पाचशे ते सातशे स्क्वेअर फूट जागा हडप करण्याचा प्रकार सुरू केला आहे. या प्रकाराकडे नगरपंचायतीच्या बांधकाम विभागाचे पूर्ण दुर्लक्ष असल्याने न.पं.कडे बांधकाम करण्यासाठी कोणतीच परवानगी न मागता तसेच आराखडा न घेता अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आले आहे. सुमारे पाच लाख रुपये किंमतीची जागा हडप करण्यात आली आहे. तसेच याच इंग्रजी माध्यमाच्या शाळेने पुढील हजार स्केअर फूट जागेवरही शाळेचे खेळण्याचे साहित्य लावून कंपाउंड करून घेतले आहे.अतिक्रमणासंबंधी काय म्हणतात... अधिकारी आणि पदाधिकारी ?याबाबत या शाळेचे व्यवस्थापक सॅम पांडे यांची प्रतिक्रिया घेतली असता, बांधकाम परवानगी काढली नाही. परंतु सदर जागा नगरपंचायतीने वापरण्यास दिली असून माझ्याकडे ठराव असल्याचे त्यांनी सांगितले. तुमच्या गावासाठीच ही शाळा असून सहकार्य करावे असे ते म्हणाले.नगरपंचायतीच्या बांधकाम विभागाचे गणेश हिवराळे यांची प्रतिक्रीया घेतली असता खुल्या भूखंडावर बांधकामाची परवानगी दिलेली नाही, असे त्यांनी सांगितले. तर बांधकाम अभियंता शिंदे यांच्याशी संपर्क झाला नाही.याबाबत नगराध्यक्षा मुमताज बी बागवान यांची प्रतिक्रिया घेतली असता, त्यांनी नगरपंचायतीने कोणतीच परवानगी दिलेली नाही. असे सांगत तसेच शासकीय प्रपत्रानुसार एकूण जागेपैकी फक्त दहा टक्के जागेवरच बांधकाम, तेही परवानगीने करावे लागते पण सदर शाळेने परवानगी घेतली नाही कार्यवाही करू असे सांगितले.तर पालिकेतील विरोधी गटनेते देवेन्द्र खेवलकर यांची प्रतिक्रिया घेतली असता नगर पंचायतीच्या खुल्या भूखंडांना सांभाळण्याची जबाबदारी सत्ताधारी व प्रशासनाची असून त्यांनी या जागांवर देखरेख करून नियोजन करायला पाहिजे.दरम्यान, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी सांगितले की, सदर प्रकाराची माहिती मिळाली आहे. नगरपंचायतीच्या जागेवर असा प्रकार झाला असेल तर तत्काळ नोटीस देऊन बांधकाम पाडण्यास सांगू. तसे न केल्यास नगरपंचायतमार्फत बांधकाम पाडण्यात येईल व खर्च वसूल केला जाईल. 

टॅग्स :Schoolशाळा