सीमा उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तीसह पोलीस कर्मचाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 12:39 IST2020-04-23T12:38:56+5:302020-04-23T12:39:28+5:30
२४ तास बंदोबस्त

सीमा उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तीसह पोलीस कर्मचाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
जळगाव : कोरोना या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी बाहेर जिल्ह्यातून एकही नागरिक जिल्ह्यात येऊ नये, यासाठी शेजारी नाशिक, बुलडाणा, धुळे व औरंगाबाद जिल्ह्याच्या बॉर्डरवर जिल्ह्यात ३१ चेकपोस्ट तयार करण्यात आले असून तेथे २४ तास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याशिवाय बºहाणपूरकडून येणाºया मार्गावरदेखील चेकपोस्ट तयार करण्यात आला आहे. दरम्यान, बंदोबस्तावरील पोलिसांना चकवा देऊन किंवा ज्या मार्गाने बाहेरील व्यक्ती जिल्ह्यात प्रवेश करेल, तेथील कर्मचाºयावर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिला आहे.
लॉकडाऊन असल्याने एका जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्यात येण्या-जाण्यास मनाई करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्याला लागून असलेले धुळे, नाशिक, बुलडाणा व औरंगाबाद या चारही जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आहेत.
त्याशिवाय जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्यादेखील पाचवर गेलेली आहे. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने नागरिकांच्या संपर्कात तो झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या आजाराला रोखण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबणे अपेक्षित आहे. जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या काही दिवसातच पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळल्याने चिंतेची बाब आहे.
लाठीसह आवश्यक साधनांचा पुरवठा
पोलीस प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमा सील केल्या असून तेथे कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. ३१ चेकपोस्टवर १२ पोलीस उपनिरीक्षक, ८० पोलीस कर्मचारी व १०४ होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना लाठी, काठी, शिट्टी, बॅटरी, रिफ्लेक्टरयासह इतर साधनांचा पुरवठा करण्यात आला आहे. त्या त्या प्रभारी अधिकाऱ्यांनी रोज दोन वेळा चेकपोस्टवर भेटी देऊन बंदोबस्ताचा आढावा घेणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक प्रत्येक चेकपोस्टवर भेटी देत आहेत.