शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

पूनर्वसन कामात कसूर करणा:या कंत्राटदारांवर कडक कार्यवाही करा - जिल्हाधिका:यांची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 22:57 IST

हतनूर प्रकल्पाने बाधीत गावातील पूनर्वसन कामे द्रूत गतीने पूर्ण करण्याच्या सूचना

ठळक मुद्देकंत्राटदारांना ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकारेल्वे उड्डाणपुलांसाठीचे संपादन तत्काळ करा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 7 - हतनूर प्रकल्पाने बाधीत झालेल्या गावांमधील ग्रामस्थांच्या भावना व समस्या जाणून घेण्यासाठी अधिका:यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन तत्काळ निर्णय घ्यावा व कामात कसूर करणा:या कंत्राटदारांवर कडक कार्यवाही करावी, अशा कडक सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी अधिका:यांना दिल्या.शनिवारी नियोजन भवनात पूनर्वसन प्रलंबित कामाची आढावा बैठक झाली. या वेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकीस  माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे,   आमदार संजय सावकारे, सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, फैजपूरचे प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, भुसावळचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

कंत्राटदारांना ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकामतदार संघातील 33 गावातील हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने येथील कामे तत्काळ मार्गी लागणे गरजेचे असल्याचे या वेळी एकनाथराव खडसे म्हणाले. या गावांमधील कामे पूर्ण होत नसून निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याविषयी त्यांनी सूचना केला. कंत्राटदार कामे करीत नसतील तर कारवाई करा अन्यथा त्यांना ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाका, अशाही सूचना खडसे यांनी या वेळी दिल्या. 

कामे दाखवा अन्यथा कारवाईस सामोरे जा हतनूर प्रकल्पाने बाधीत झालेल्या गावांचे पूनर्वसनाची कामे संबंधित अधिका:यांनी द्रूत गतीने पूर्ण करावीत असे सांगून  ज्या नागरिकांनी सामाजिक भावनेतून आपल्या जमिनी दिल्या व त्यामुळे  मोठे सिंचन प्रकल्प उभारले गेले त्यांना  वेळीच न्याय देणे आपले कर्तव्य आहे. यानंतर होणा:या बैठकीत पूनर्वसन कामांच्या प्रगतीचा वेग दिसला पाहिजे अन्यथा कडक कार्यवाहीस सामोरे जावे लागेल अशा सूचनाही जिल्हाधिका:यांनी दिल्या.

 या बैठकीत भुसावळ, मुक्ताईनगर, जळगाव, रावेर तालुक्यातील एकूण 33 गावातील भुसावळ तालुक्यातील  टहाकळी, मुक्ताईनगर तालुक्यातील मेहूण, चिंचोल, चांगदेव, कोथळी, मुक्ताईनगर, घोडसगाव, चिंचखेडा, खामखेडा, मेळसांगवे, शेमळदे, पंचाणे, मुंढोळदे, उचंदे, मेंढोदे, पिंप्रीनांदू, धामंदे, अंतुर्ली, जळगाव तालुक्यातील कुंड, रावेर तालुक्यातील  मांगलवाडी, तांदलवाडी, सिंगत, पुरी, गोलवाडे,  भामलवाडी,  शिंगाडी,  कांडवेल,  ऐनपूर, निंबोल, बोहार्डे, पातोंडी, धुरखेडा, अजनाड  गावातील पुर्नवसनाबाबत गाव निहाय आढावा घेण्यात आला. यावेळी त्या-त्या गावांचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. 

रेल्वे उड्डाणपुलांसाठीचे संपादन तत्काळ करारावेर लोकसभा मतदार संघातील चार उड्डाणपुलांचा प्रश्नही गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मंजुरी मिळाली असताना केवळ जमीन संपादन बाकी असल्याने हे काम बाकी आहे. त्यामुळे ते तत्काळ मार्गी लावण्यात यावे, अशा सूचना खासदार रक्षा खडसे यांनी या वेळी दिल्या. सावदा, निंभोरा, बोदवड, रावेर येथील हे पूल असून त्यांचे काम तत्काळ मार्गी लावावे, असेही त्यांनी सूचित केले.