शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

नवरात्रीच्या वर्गणीवरुन जळगावात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:34 PM

जळगाव : नवरात्रोत्सवानिमित्त देवीची वर्गणीची पावती फाडण्याच्या कारणावरुन इच्छादेवी चौकात गुरुवारी रात्री आठ वाजता वाद झाला. त्यात तिघांनी बेदम ...

जळगाव : नवरात्रोत्सवानिमित्त देवीची वर्गणीची पावती फाडण्याच्या कारणावरुन इच्छादेवी चौकात गुरुवारी रात्री आठ वाजता वाद झाला. त्यात तिघांनी बेदम मारहाण करुन संदीप सुरेश पाटील या चहा विक्रेत्याच्या डोक्यात बियरची बाटली मारली. त्यात संदीप रक्तबंबाळ झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, या घटनेमुळे इच्छादेवी चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळवून सोन्या शिरसाठ याला ताब्यात घेण्यात आले आहे. भल्या तडवी व चेतन परदेशी दोघं जण फरार झाले आहेत. या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल व संदीप पाटील या दोन्ही भावांची इच्छा देवी चौकात चहाची टपरी आहे. सोन्या शिरसाठ, भल्या तडवी व चेतन परदेशी असे तिघं जण देवीची पावती फाडण्यासाठी राहूलकडे आले. त्याने ५०० रुपये दिले, या रकमेवर समाधान न झाल्याने या तिघांनी तीन हजार रुपये मागितले, ते देण्यास नकार दिला असता तिघांनी राहूल याला मारहाण करायला सुरुवात केली.भांडण सोडविण्यासाठी आलेल्या संदीप याच्या डोक्यात एकाने बियरची बाटली मारली. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, नितीन पाटील, गोविंदा पाटील, किशोर पाटील, सचिन चौधरी व अतुल पाटील यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

टॅग्स :Jalgaonजळगाव