यावल रस्त्यावर झाडावर दुचाकी आदळून दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 21:49 IST2018-10-16T21:48:17+5:302018-10-16T21:49:32+5:30
यावल रस्त्यावर विरवाडे फाट्याजवळील झाडाला दुचाकी धडकल्याने त्यावरील स्वार तिघे गंभीर जखमी झाले.

यावल रस्त्यावर झाडावर दुचाकी आदळून दोघे ठार
चोपडा : येथील यावल रस्त्यावर विरवाडे फाट्याजवळील झाडाला दुचाकी धडकल्याने त्यावरील स्वार तिघे गंभीर जखमी झाले. त्यातील दोघे मृत झाले तर एक उपचार घेत आहे.
मंगळवार १६ रोजी रात्री १२:३० च्या सुमारास अंकलेश्वर बुºहाणपूर रस्त्यावरील विरवाडे फाट्याजवळ एम.पी.४६ एम.ई.०८३२ या क्रमांकाची दुचाकी चिंचेच्या झाडावर आदळली. त्यावरील स्वार सायसिंग मयाराम बारेला (२२), सुमाऱ्या बारेला व रवींद्र बारेला (सर्व रा.अंबाखांबा ता.शिरपूर जि.धुळे) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत चोपडा शहर पोलिसात डॉ.नरेंद्र पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.