भुसावळ येथे अखिल भारतीय हिंदी नाट्य महोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 22:20 IST2018-11-20T22:19:28+5:302018-11-20T22:20:32+5:30

भुसावळ मध्य रेल्वे क्षेत्रीय प्रशिक्षण संस्थेत आयोजित अखिल रेल हिंदी नाट्य महोत्सवात मध्य रेल्वेच्या दृष्टी या नाटकाने विजेतेपद पटकावले.

The story of the All India Hindi Natya Mahotsav at Bhusawal | भुसावळ येथे अखिल भारतीय हिंदी नाट्य महोत्सवाची सांगता

भुसावळ येथे अखिल भारतीय हिंदी नाट्य महोत्सवाची सांगता

ठळक मुद्देअखिल रेल्वे हिंदी नाट्य उत्सवात मध्य रेल्वेच्या दृष्टी नाटकाने पटकाविले विजेते पददेशभरातून रेल्वेच्या विविध विभागांतून १६ नाट्य प्रकार सादर

भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वे क्षेत्रीय प्रशिक्षण संस्थेत आयोजित अखिल रेल हिंदी नाट्य महोत्सवात मध्य रेल्वेच्या दृष्टी या नाटकाने विजेतेपद पटकावले. विजेत्या टीमला अपर महाप्रबंधक विशाल अग्रवाल, मुख्य वीज अभियंता राजभाषा अधिकारी एस.पी.वावरे, अपर भुसावळ मंडळ प्रबंधक मनोज सिन्हा, उपप्रबंधक विपीन पवार, झेडटीएसचे प्राचार्य, प्रदीप हिरडे यांच्याहस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी, रोख बक्षिसे देऊन देऊन सन्मानित करण्यात आले.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात अखिल रेल हिंदी नाट्य महोत्सवाचे आयोजन पद मिळाल्यानंतर १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान क्षेत्रीय रेल प्रशिक्षण संस्थानमध्ये हिंदी नाट्य महोत्सव झाला. यात देशभरातून रेल्वेच्या विविध विभागांतून १६ नाट्य प्रकार सादर करण्यात आले होते. हिंदी भाषेचा प्रचार, प्रसार वाढावा व संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रथम पुरस्कार मध्य रेल्वे, मुंबई मंडळाच्या दृष्टी या नाटकाला मिळाले, द्वितीय पुरस्कार पूर्वोत्तर सीमा रेल्वे देवघर के.सपने, तृतीय पुरस्कार दक्षिणपूर्व मध्य रेल्वे बिलासपूर मूर्तिवान या नाटकांना मिळाले.
प्रथम प्रेरणा पुरस्कार- पूर्वोत्तर रेल्वेच्या मैमूद, द्वितीय पुरस्कार- उत्तर रेल्वे फिरोजपूर मंडळाच्या नारी ,तृतीय पुरस्कार- चित्तरंजन रेल कारखानाच्या जनक, चतुर्थ पुरस्कार पश्चिम रेल्वेच्या नमक का दरोगा, पाचवा पुरस्कार- डिझेल इंजन कारखाना पटियालाच्या आषाढ का एक दिन यांना मिळाले.
तसेच सर्वश्रेष्ठ निर्देशक म्हणून दृष्टी या नाटकाच्या संतोष वेरुळकर, अभिनेता दृष्टीच्या जितेंद्र आगरकर, अभिनेत्री दृष्टीच्या आकांक्षा, सहअभिनेता पश्चिम रेल्वेच्या नमक का दरोगा, सहअभिनेत्री पूर्वोत्तर रेल्वेच्या नाटकाच्या मीरा सिद्धार्थ, सर्वश्रेष्ठ संगीत -पूर्वोत्तर सीमा रेल्वेच्या देवघर के सपने या नाटकाच्या देव कुमार राम, सर्वश्रेष्ठ ध्वनी प्रभाव- पश्चिम रेल्वे नमक का दरोगा या नाटकाच्या ज्ञानेश पेंढारकर, सर्वश्रेष्ठ मंच -दृष्टी नाटकाच्या विशाल शिंदे, सर्वश्रेष्ठ प्रकाश परिकल्पना -प्रशांत घोगरे, वेषभूषा- महाभारत या नाटकाच्या नीरज उपाध्याय, रूपसज्जा- देवघर के सपने या नाटकाच्या ज्योतिष चंद्रठाकूरीया, उच्चारण - दक्षिण पश्चिम रेल्वे समुद्र के उस पार या नाटकाच्या सर्व कलाकारांना, स्क्रिप्ट लेखन- पूर्वोत्तर रेल्वेच्या मैमूद या नाटकाच्या आसिफ, बाल कलाकार- मेट्रो रेल कोलकत्ता शहीद कि माँ या नाटकाच्या कुमारी आदिजा बंदोपाध्याय, विशिष्ट अभिनय पुरस्कार -नारी नाटकाच्या स्माईली ठाकूर यास मिळाले.
परीक्षक म्हणून नाट्यसमीक्षक चिंतामण पाटील नुपूर कथकचे रमाकांत भालेराव, नहाटा महाविद्यालयाचे माजी ग्रंथपाल दिलीप देशमुख यांनी काम पाहिले.
कार्यक्रमासाठी मध्य रेल्वे मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणार्थी, यातायात प्रशिक्षक बापू सरोदे यांनी परिश्रम केले. सूत्रसंचालन राकेश भावसार यांनी, तर आभार रेल्वे मंत्रालय उपनिदेशक (राजभाषा) नीरू पटणी यांनी केले.


 

Web Title: The story of the All India Hindi Natya Mahotsav at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.