वीजचोरी रोखणा:यांवर दगडफेक, अभियंता जखमी
By Admin | Updated: May 6, 2017 00:47 IST2017-05-06T00:47:51+5:302017-05-06T00:47:51+5:30
मुक्ताईनगर तालुक्यातील पातोंडीची घटना : पोलिसात गुन्हा दाखल

वीजचोरी रोखणा:यांवर दगडफेक, अभियंता जखमी
मुक्ताईनगर : तालुक्यातील पातोंडी येथे वीजचोरी व आकडे टाकलेल्यांवर कारवाई करत असताना वीजचोरांकडून पथकावर दगडफेक करत अंतुर्लीच्या कनिष्ठ अभियंत्यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास घडली. रात्री उशिरार्पयत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. महिनाभरापासून विद्युत वितरण कंपनीतर्फे वीजचोरीवर आळा घालण्यासाठी भरारी पथक नेमले असून विविध ठिकाणी धाडी घालत दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जात आहे. 5 मे रोजी महावितरणचे पथक पातोंडी येथे कारवाईसाठी अचानक हजर झाले. पथकात अंतुर्लीचे कनिष्ठ अभियंता सचिन आठवले, शीतल तायडे, जमुना तडवी, मुकेश सनांसे, विजय केळकर, खलील तडवी, आशिष पाटील यांचा समावेश होता. या वेळी गावाच्या सुरुवातीच्या भागात मोठय़ा प्रमाणात तारांवर आकडे टाकल्याचे निदर्शनास आल्याने कारवाई सुरू झाली .
काही वेळातच जमाव जमून पथकाला शिव्या देत आरडाओरड करू लागले. या वेळी संतोष ज्ञानेश्वर शिरतुरे, पांडुरंग सुरेश वाघ, संदेश सुनील शंकपाळ, अजय गणेश वाघ, शुभम तुकाराम पानपाटील, राहुल अनिल शंकपाळ, सांडू सुरेश वाघ व कैलास रामदास शिरतुरे यांनी पथकावर दगडफेक करत चारचाकी क्र.(एमएच 19- एपी 5121) वर दगड तसेच लाथा मारून गाडीचे नुकसान केले. त्यानंतर अंतुर्लीचे कनिष्ठ अभियंता सुरेश हरिश्चंद्र आठवले यांना मारहाण करायला सुरुवात केले. प्रत्यक्षदर्शी व महिला कर्मचा:यांच्या म्हणण्यानुसार मारहाण इतकी होती की त्यांना गावाच्या प्रथमदर्शनी भागातून अक्षरश: मारत गावाच्या मध्यभागार्पयत नेले. याप्रसंगी सरपंच यांनी त्यांना घरात घेतल्यानंतर पुढील अनर्थ टळला. गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू असून पोलीस स्थानकात तालुक्यातील सर्व वीज कर्मचारी व काही अधिकारी जमा झाले होते.
याप्रसंगी मुक्ताईनगरचे कनिष्ठ अभियंता यांनी सांगितले की आमचे कर्तव्य बजावत असताना आम्हालाच मारहाण होत असेल तर आम्ही काम तरी जसे करावे. पोलीस तपासात काय कारवाई होते याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.