शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यात अडविले, मोबाईल हिसकाविला; आरडा-ओरड होताच लोकांनी पकडले !

By सागर दुबे | Updated: April 7, 2023 18:43 IST

तिघांना अटक, एक फरार ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा

जळगाव : मोबाईल दुरूस्तीसाठी घेऊन जात असताना लखिचंद वामन बडगुजर (५६, रा. दादावाडी) यांना चार जणांनी रस्त्यात अडवून मारहाण करीत त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. दरम्यान, त्यांनी आरडा-ओरड केल्यामुळे आजू-बाजूच्या लोकांनी तीन जणांना पकडले. मात्र, एक पसार होण्यास यशस्वी झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास पिंप्राळा आठवडे बाजार रस्त्यावर घडली असून तिघांना रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

लखिचंद बडगुजर हे दादावाडी येथे कुटूंबासह वास्तव्यास असून स्कूल बस चालवून कुटूंबियांना उदरनिर्वाह करतात. तीन दिवसांपासून बंद असल्यामुळे बडगुजर हे शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास मोबाईल घेऊन दुरूस्तीसाठी पिंप्राळ्यातील सोमाणी मार्केट येथे जाण्यासाठी निघाले. आदर्श हॉटेल मागील पिंप्राळा आठवडे बाजार रस्त्यावरून जात असताना त्यांना चार तरूणांनी अडवून त्यांच्या खिशातील मोबाईल बळबजरीने हिसकाविला. त्यांनी प्रतिकार केला पण, चौघांनी त्यांना मारहाण करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बडगुजर यांनी आरडा-ओरड केल्यानंतर आजू-बाजूच्या लोकांनी लागलीच तीन जणांना पाठलाग करून पकडले तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर लोकांनी तिघांना रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर बडगुजर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावPoliceपोलिस