नांदगाव स्टेशनला ८ एप्रिल पासुन तीन गाड्यांना थांबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 20:46 IST2023-03-31T20:45:47+5:302023-03-31T20:46:07+5:30
भुसावळ विभागातील नांदगाव स्टेशनला ८ एप्रिल पासून तीन एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.

नांदगाव स्टेशनला ८ एप्रिल पासुन तीन गाड्यांना थांबा
जळगाव :
भुसावळ विभागातील नांदगाव स्टेशनला ८ एप्रिल पासून तीन एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. यामध्ये कुशीनगर एक्सप्रेस(गाडी क्रमांक २२५३७-३८), कामायनी एक्सप्रेस(गाडी क्रमांक ११०७१-७२ ) व जनता एक्सप्रेस(गाडी क्रमांक १३२०१-०२) या एक्सप्रेस
गाड्यांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या या गाड्यांना नांदगाव स्टेशनला थांबा मंजुर झाल्यामुळे, प्रवाशांमधुन आनंद
व्यक्त आहे. दरम्यान, प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यासांठी या गाड्यांना थांबा देण्यात आला असल्याचे भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.