आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्यावतीने जळगाव व पहूर येथे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 12:28 IST2018-08-13T12:27:57+5:302018-08-13T12:28:40+5:30
वाहतूक खोळंबली

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्यावतीने जळगाव व पहूर येथे रास्ता रोको
जळगाव / पहूर : धनगर समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोमवारी सकाळी जळगाव व जामनेर तालुक्यातील पहूर येथे रास्ता रोको करण्यात आला. यामुळे वाहतूक खोळंबली होती.
जळगाव येथे धनगर समाजा उन्नती मंडळातर्फे इच्छा देवी चौकात नगरसेवक सदाशिवराव ढेकळे यांच्या नेतृत्त्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. या ठिकाणी आमदार सुरेश भोळे यांनी भेट देऊन चर्चा केली. त्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सुरेश भोळे यांनी मागण्या शासनापर्यंत पोहचवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. आपल्या मागण्यांकडे लक्षही वेधले जावे व कोणाला त्रास होऊ नये या उद्दाने १० मिनिटेच आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
जामनेर तालुक्यातील पहूर येथेदेखील सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास जळगाव - औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.