मुक्ताईनगरात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात रास्ता रोको
By Admin | Updated: May 11, 2017 14:17 IST2017-05-11T14:17:45+5:302017-05-11T14:17:45+5:30
मुक्ताईनगरात पुतळा दहनाचा प्रयत्न फसला. जोरदार घोषणाबाजी करीत वक्तव्याचा केला निषेध
मुक्ताईनगरात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात रास्ता रोको
मुक्ताईनगर, दि.11- तूर खरेदीसंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूर खरेदीसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर गुरुवारी सकाळी 11 वाजता प्रवर्तन चौकात रास्ता रोको करण्यात आला़ प्रसंगी दानवेंचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला़
जालना येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात दानवे यांनी एका कार्यकत्र्याने तूर खरेदीचा प्रश्न विचारला असता दानवेंनी आक्षेपार्ह विधान केले होत़े दुस:या दिवशी गुरुवारी त्याचे पडसाद येथे उमटल़े
गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास प्रवर्तन चौकात रास्ता रोको करण्यात आला़ प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, तालुकप्रमुख छोटू भोई, अफसर खान , विठ्ठल तळेले, सुनील पाटील, प्रवीण पाटील, सचिन पाटील, गोपाळ सोनवणे, साबीर पटेल, दिलीप मराठे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होत़े प्रसंगी नायब तहसीलदार शांताराम चौधरी यांना निवेदन देण्यात आल़े
दरम्यान, कार्यकत्र्यानी दानवेंचा पुतळा दहनाचा प्रयत्न केला मात्र पोलीस निरीक्षक अशोक कडलग व सहका:यांनी तो हाणून पाडला़