खंडीत वीजपुरवठ्याने त्रस्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 12:23 IST2020-02-26T12:23:46+5:302020-02-26T12:23:53+5:30
वीज उप केंद्राला ठोकले टाळे

खंडीत वीजपुरवठ्याने त्रस्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको
कजगाव, जि. जळगाव : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडीत होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लोण पिराचे, ता. भडगाव येथील वीज उप केंद्राला टाळे ठोकत लोण रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. त्यानंतर वीज वितरणच्या अधिकाºयांनी संतप्त शेतकºयांची भेट घेऊन तांत्रिक अडचण असल्याने गेल्या तीन- चार दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे सांगितले.