शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

चिंचोलीत केळीच्या शेतात सापडली पारगावहून चोरलेली बैलजोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 6:02 PM

पारगाव येथून दोन शेतकऱ्यांचे चोरीस गेलेले एक-एक बैल बुधवारी चिंचोली, ता.यावल येथील डॉ.भालेराव साठे यांच्या केळीच्या शेतात सापडल्याने शेतकरींचे आर्थिक नुकसान होण्यापासून वाचले.

बिडगाव, ता.चोपडा, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या पारगाव येथून दोन शेतकऱ्यांचे चोरीस गेलेले एक-एक बैल बुधवारी चिंचोली, ता.यावल येथील डॉ.भालेराव साठे यांच्या केळीच्या शेतात सापडल्याने शेतकरींचे आर्थिक नुकसान होण्यापासून वाचले.मंगळवारी रात्री धानोरा येथे रमेश महाजन यांना रवी टेलर यांच्या घराजवळ काही चोर लपलेले दिसल्याने त्यांनी पोलीस पाटलासह लोकांना बोलावून परिसर पिंजून काढला होता. मात्र चोर पळून गेले होते. पारगाव येथून येथील शेतकरी विलास अर्जुन पाटील व बी.आर. पाटील यांचा प्रत्येकी एक एक बैल रात्री चोरीस गेला आहेत.त् यामुळे धानोरा व पारगाव येथील तरूनांनी पुन्हा बैलजोडीची शोधमोहीम सुरू केली असता चिंचोली येथील शेतकरी डॉ.भालेराव बाऊराव साठे यांच्या शेतात केळीचेखोड काढणारे मजूर विक्रम कोळी व निंबा पाटील यांनी दाट केळीच्या शेतात बैलजोडी बांधलेली बघून तेथील पोलीस पाटील राकेश साठे यांना कळविले. त्यांनी धानोरा येथील किरण महाजन यांना फोन करून बैल जोडीमालक विलास पाटील व बी.आर पाटील यांच्या ताब्यात बैलजोडी दिली. त्या आधी दोघांनी बैल जोडी चोरीची फिर्याद अडावद पोलीस स्टेशनला नोंदविली होती. धानोरा पोलीस पाटील दिनेश पाटील, पारगावचे शरद पाटील, चिंचोलीचे राकेश साठे यांनी समन्वय साधत तुरूंनाच्या मदतीने शेतकऱ्यांना बैल जोडी परत मिळवून दिली.