जळगाव जिल्हा बँकेच्या चाळीसगाव शाखेत चोरीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 13:13 IST2019-07-16T13:04:15+5:302019-07-16T13:13:38+5:30
आरडाओरडमुळे चोरट्यांनी काढला पळ

जळगाव जिल्हा बँकेच्या चाळीसगाव शाखेत चोरीचा प्रयत्न
चाळीसगाव, जि. जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या हिरापूर रोड चाळीसगाव या शाखेत सोमवारी मध्यरात्री रात्री तीन ते साडे तीन वाजेच्या दरम्यान चोरीचा प्रयत्न झाला. जिल्हा बँकेच्या शाखेच्या शटरचे कुलूप तोडून पाच ते सहा जण वाहनामध्ये येऊन तिजोरी उचलून नेण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी बँक शाखेच्या इमारतचे मालक डॉ. शिवाजीराव देशमुख यांना जाग आल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे चोर पळून गेले. सकाळी पोलिसांनी पंचनामा केला.